मराठी भाषा वर्ग- मुग्धा रत्नपारखी (२०१५-२०१९)


 

आधी बीज एकले

 

‘बोलतो मराठी’ हा लहान मुलांसाठी मराठी भाषाविषयक उपक्रम काही वर्षांपूर्वी मुग्धा रत्नपारखी यांनी सुरू केला. त्या वेळेला मुग्धा रत्नपारखी  आणि काही उत्साही व्यक्तींनी मुलांचा मातृभाषेशी संपर्क कायम रहावा या उर्मींने सुरू केलेला तो वर्ग होता. सुरुवातीला खाजगी उपक्रम म्हणून चालू असलेला उपक्रम ! आता या उपक्रमाला महाराष्ट्र  मंडळाने व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. महाराष्ट्रातील घडामोडींशी, मराठी भाषेशी, आपल्या नातेवाईकांशी, भारतातल्या भावंडांशी संवाद साधता येईल इतपत मराठी त्यांना यावं, यासाठी हा प्रयत्न अजूनही सुरू आहे. यात प्रामुख्याने भर मराठी गाणी, कविता, गोष्टी, श्लोक, पाठांतर याद्वारे मुलांशी संवाद साधणे याकडे असतो. भारतातून पालकांची अचानक बदली झाल्यामुळे आणि येथील जीवनपद्धती तसेच शाळेत रुऴे पर्यंत मुलांना मनातला सांगायला एखादी सुरक्षित जागा असावी असं फार वाटतं. इथे Mandarin आणि Spanish, French शिकायला उत्सुक असणारी मुलं, मराठीच्या बाबतीत उदासीन होऊ नयेत यासाठी खास प्रयत्न करावे लागतात, आणि ते या उपक्रमाद्वारे केले जातात.

 

या उपक्रमात संख्याने जास्त मुलं नाहीत तरीही जी आता आहेत, त्यांचे पालक शिकण्याबाबतीत  ठामपणे आहेत म्हणून उपक्रम सुरू आहे. गेल्या काही वर्षात अनेक लोकांनी जगभरातून संपर्क साधला आणि जमेल तशी मंडळाने एकमेकांना मदत केली.

 

एकत्र महाराष्ट्र गीत, पसायदान, गणपती अथर्वशीर्ष, कविता, वाचन, गीतरामायण, ज्ञानेश्वर-रामदास-तुकाराम, ते पार दुष्काळ आणि पाणी फ़ाऊंडेशन अशा विविध विषयांना हात घालू शकलो. मुलांना या विषयांची तोंडओळख का होईना करून देऊ शकलो. पुरणपोळ्या, गोपाळकाला, लिंबू सरबत, भेळ करू शकलो. जमेल तसे आणि तितके हे मराठीचे बीज रोवायचा प्रयत्न केला आणि करत राहू.

 

 

- मुग्धा रत्नपारखी (२०१५- २०१९)