Upcoming Events


गणेशोत्सव २०२१

या वर्षी हॉंगकॉंगमधील कोविड नियमावली नुसार गणेशोत्सव अतिमर्यादित स्वरूपात साजरा करावा लागणार आहे, या बद्दल आम्ही दिलगीर आहोत. पण निदान साजरा तरी करता येईल, हे ही नसे थोडके. आपल्या सामंजस्याची आणि सहकार्याची नितांत आवश्यकता आहे. गर्दीच्या आणि मंडळाच्या कार्यक्रमाच्या वेळा टाळून १० सप्टेंबर- १९ सप्टेंबर या दरम्यान आपण मंडळाच्या गणपतीच्या दर्शनासाठी कधीही जाऊ शकता. (१८ सप्टेंबर दुपारनंतरची वेळ सोडून). 

 

स्थळ- Happy Valley, Hindu Temple

 

 कार्यक्रमाची रूपरेषा

  • 10 Sep 2021 - श्री गणेश प्रतिष्ठापना (Registrations closed)
  • 11 Sep 2021 - गणपती अथर्वशीर्ष पठण, लहान मुलांसाठी अथर्वशीर्ष पाठांतर स्पर्धा, आरती, महाप्रसाद-2 (Registrations closed). सहसा एकच महाप्रसाद आयोजित करण्यात येतो, पण अधिक लोकांना सोयीचे व्हावे, आणि गर्दी होऊ नये यासाठी या वर्षी आणखी एक महाप्रसाद आयोजित केला आहे.
  • 18 Sep 2021 - स्वरवंदना कार्यक्रम. स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांना आदरांजलीपर गीतांचा सुरेल कार्यक्रम (Registrations closed)
  • 18 Sep 2021- आरती, महाप्रसाद १(Registrations closed)

 

नावनोंदणी केलेल्या सर्व उपस्थितांचे नाव, लसीकरणाचे तपशील गोळा केले गेले आहेत.  

 

हा सर्व डोलारा समिती आणि स्वयंसेवकांच्या कष्टांवर उभा राहतो. कोणी मुलांना अथर्वशीर्ष शिकवण्याची जबाबदारी घेतं, कोणी महाप्रसादाला पु-या लाटायला मदत करतं, कोणी प्रशस्तीपत्रक डिझाईन करतं, कोणी coupon डिझाईन करतं, मंडळी अडीच- तिन महिने पदरमोड करून संगीताच्या कार्यक्रमाच्या तालमी करतात, कोणी पूजा सांगायला येतं, कोणी वाढायला उभं राहतं, कोणी अल्पोपहारासाठी तजवीज करतं, कोणी मखर तयार करतं, कोणी मूर्ती, कोणी पूजेची तयारी आणि सजावट, कोणी प्रसाद तयार करून सर्वांसाठी आणतं, थोडक्यात, घरचे कार्य असल्यासारखी मंडळी उभी राहतात.

या घरच्या कार्यासाठी देणग्या नम्रपणे स्वीकारल्या जातील. मंदिराला देणगी, ध्वनीव्यवस्थेचा खर्च, अल्पोपहाराचा खर्च, महाप्रसादाचा खर्च, असे अनेक खर्च आपल्यापुढे असतात. सर्व खर्च वजा करून रक्कम उरली तर ती एखाद्या सामाजिक संस्थेला दान करण्यात येते. 

Please note that we are *not* allowed to keep Mandal donation boxes at the temple this year. Hence, if you would like to make a donation, please write to maharashtramandalhk@gmail.com 

All the proceeds will go to charity after deducting expenses. 

We deeply regret that we cannot accept any more registrations for the events, but you are welcome to visit the temple for a darshan, barring the event timings*?*. Attendance for the events is by pre- registration only. 

May Lord Ganesha bless us all. Wishing you a safe and happy and socially distanced but emotionally connected Ganpati festival 2021. Please try to understand our constraints this year.