मराठी साहित्याविषयी आस्था आणि मराठी भाषेवर प्रेम असणार्यांसाठी ‘वाचनमात्रे’ हा उपक्रम २०१५ मध्ये मुग्धा रत्नपारखी यांनी सुरू केला.
मंडळी अधून- मधून भेटून साहित्यावर / पुस्तकांवर चर्चा करतात. तसेच ‘वाचनमात्रे’ या What’s App ग्रुपद्वारे बातम्या, लेख, कविता, पुस्तकांचे दुवे या विषयी गप्पा मारतात.
जागतिक मराठी भाषा दिवसा निमित्ताने फेब्रुवारी महिन्यात अभिवाचनाचा कार्यक्रम/ साहित्यविषयक उपक्रम सादर करण्यात येतो. दर वर्षी मंडळी दोन महिने अभिवाचनाच्या कार्यक्रमाच्या तालमी करतात. रंगकर्मी आणि दिग्दर्शक श्री सुनील कुलकर्णी यांचे मार्गदर्शन यासाठी लाभते.
२०१६ : लेखक प्रकाश नारायण संतांच्या साहित्यावर आधारित अभिवाचनाचा कार्यक्रम
२०१७ : ‘स्मृतीचित्रे ‘ या लक्ष्मीबाई टिळकांच्या आत्मचरित्रावर आधारित अभिवाचनाचा कार्यक्रम
२०१८: लेखक श्री. व्यंकटेश माडगुळकरांच्या साहित्यावर आधारित अभिवाचनाचा कार्यक्रम
२०१९: मराठीतील निवडक बालसाहित्यावर आधारित अभिवाचनाचा कार्यक्रम
२०२१: ‘पुस्तक विश्व ' या उपक्रमांतर्गत आपल्या आवडत्या मराठी पुस्तकांवर लहान मुलांनी केलेले ऑनलाइन व्हिडिओ सादरीकरण तसेच २७ फेब्रुवारी २०२१ ला सुलेखनकार श्री अच्युत पालव यांचे ऑनलाइन व्याख्यान आणि प्रात्यक्षिक संपन्न झाले.
२०२२: ‘कविता पानोपानी' या उपक्रमांतर्गत आपल्या आवडत्या मराठी कवितेचं सादरीकरण केलं. लहान मुलांनी तसेच मोठ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आणि आपापले विडिओ आणि हस्थलिखित कविता सादर केल्या.