स्मृतीचित्रे


महाराष्ट्र मंडळ हॉंगकॉंगचे अधिकृत पंजीकरण (Registration) २००३ मध्ये करण्यात आले. तरीही हॉंगकॉंगमध्ये मुठभर मराठी मंडळी साधारण १९६० पासून तरी नक्की स्थायिक होती, कारण पु.ल. देशपांडेंच्या “पूर्वरंग” मध्ये तसा निश्चित उल्लेख आहे (“पूर्वरंग” ची पहिली आवृत्ती - १९६३).

 

या चिमुकल्या डोंगराळ बेटांवर राहणा-या मराठी मंडळींनी आपापल्या परीने जमेल तशी उस्तवार केली, म्हणून आमच्यापर्यंत काहीतरी मराठीपण आणि परक्या देशात थोडासा आपल्या भाषेचा आणि लोकांचा आधार आणि ओलावा पोहोचू शकला. 

 

आपल्याला जमेल तसतशी या जुन्या जाणत्यांची या सुंदर शहरातली ही अनुभवसमृद्धी नोंदवून ठेवावी म्हणून हे स्मृतीचित्रांचे दालन. आमच्यापेक्षा त्यांचा प्रवास नक्कीच अवघड होता, आणि आमच्या नंतर आलेल्यांचा प्रवास आमच्यापेक्षा सुकर व्हावा यासाठीच तर महाराष्ट्र मंडळ आहे, ही माझी साधी धारणा ! 

 

- मुग्धा कारंजेकर- रत्नपारखी 

  अध्यक्ष - महाराष्ट्र मंडळ हॉंगकॉंग     (२०२१-२०२४)