Help The Blind Foundation

जानेवारी २०२४- Help the Blind Foundation यांना महाराष्ट्र मंडळ हॉंगकॉंगतर्फे दिलेल्या देणगीतून Voice to Text Software असलेल्या १६ Laptops चे वाटप फ़र्गसन महाविद्यालय पुणे आणि गरवारे कॉलेज पुणे येथील अंध विद्यार्थ्यांना करण्यात आले. या प्रसंगी Help the Blind Foundation चे विश्वस्त श्री शिवाजी राव, व महाराष्ट्र मंडळ हॉंगकॉंग तर्फे मुग्धा रत्नपारखी आणि अरूणा सोमण उपस्थित होते. आपल्या सर्व दात्यांचे मनःपूर्वक आभार. महाराष्ट्र मंडळ हॉंगकॉंगचा सामाजिक बांधिलकी जपण्याचा नेहमीच प्रयास असतो.